Type Here to Get Search Results !

हडपसर येथील अवैध धंद्यांवर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई ; वीस जणांना केली अटक ; हडपसर पोलीस ठाण्याची वसुली वाल्यांकडून अवैध धंद्याची पाठराखण...

हडपसर येथील अवैध धंद्यांवर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई ; वीस जणांना केली अटक ; हडपसर पोलीस ठाण्याची वसुली वाल्यांकडून अवैध धंद्याची पाठराखण...

पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणारे सामाजिक सुरक्षा विभागाने हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर छापा टाकून कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी वीस जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल 13000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गाडीतळ आणि साडे सतरा नळी भागात चालू असणाऱ्या अवैध धंद्यांवर या कारवाया करण्यात आल्या.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असणारे अवैध धंदे रोखण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाने पुढाकार घेतला होता. त्यानुसार साडे सतरा नळी आणि गाडीतळ परिसरात जुगार आणि अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक आणि हडपसर पोलीस स्टेशनचे पथक अशा दोघांनी संयुक्त कारवाई करत हे अवैध धंद्यांचे अड्डे उध्वस्त केल. या कारवाईदरम्यान जुगार खेळणाऱ्या आणि अवैध दारू विक्रीत सहभागी असणाऱ्या वीस आरोपींना अटक करण्यात आली.

याशिवाय सामाजिक सुरक्षा विभागाने अवैध धंद्यांविरोधात सहा गुन्हे दाखल करून एकूण 24 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 26 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हडपसर पोलीस ठाण्याची वसुली वाल्यांकडून अवैध धंद्याची पाठराखण...

यामध्ये या अवैध धंद्यांना पाठराखण हडपसर पोलीस ठाण्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांचे नेमलेले वसुली बहाद्दूरच अश्या धंद्यांना वाव देत आहेत आणि पाठराखण करत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. तसेच असा प्रश्न पडला आहे की, अक्षरशः या कारवाईसाठी पुणे शहरातून सामाजिक सुरक्षा विभागाला हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येऊन कारवाई करण्याची गरज पडत आहेत. 

या हडपसर पोलीस ठाण्यातील वसुलीवाल्यांवर पोलीस आयुक्त कधी कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments