Type Here to Get Search Results !

व्यक्तिगत हल्ले करणाऱ्या मोदींवर शरद पवारांची टिका ; मी माझ्या पुर्ण आयुष्यात असा पंतप्रधान कधीच पाहिला नाही....


व्यक्तिगत हल्ले करणाऱ्या मोदींवर शरद पवारांची टिका ; मी माझ्या पुर्ण आयुष्यात असा पंतप्रधान कधीच पाहिला नाही....

मुंबई:- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या त्या राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर व्यक्तिगत हल्ले केले. हे पहिले पंतप्रधान आहेत की जे एखाद्या राज्यात जातात आणि तिथे इतर पक्षाच्या नेतृत्वावर व्यक्तिगत हल्ले करतात, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केला.

माढा मतदारसंघातील कापसेवाडी येथे ते बोलत होते.

मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू त्यानंतर लालबहादूर शास्त्र्ााrजी, इंदिरा गांधींपासून सर्वच पंतप्रधानांची भाषणे ऐकली. तेव्हा पथ्य पाळले जायचे. पंतप्रधान कुठल्याही राज्यात गेले तरी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख अनादराने करत नव्हते. पण हे पहिले पंतप्रधान आहेत की जे राज्यात जातात आणि तिथे जर इतर पक्षाचे सरकार असेल तर तेथील नेतृत्वावर व्यक्तिगत हल्ले करतात. ज्यावेळी आत्मविश्वास ढळतो तेव्हा माणूस व्यक्तिगत टिकाटिप्पणी करू लागतो, असा टोलाही शरद पवार यांनी मोदींना लगावला.

मंदिरात जायला पैसे द्यावे लागतात का?

मध्य प्रदेशात भाजपला जिंकून आणा अयोध्येत रामलल्लाचे दर्शन मोफत करून देऊ असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारसभेत केले. याचा खरपूस समाचार शरद पवार यांनी घेतला. मंदिरात जायला काय पैसे द्यावे लागतात का? पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला पैसे द्यावे लागत नाहीत. पण रामलल्लाचे दर्शन फुकट वगैरे सांगतात याचा अर्थ राज्यकर्ते इतक्या पातळीवर उतरलेत की त्याची चर्चाही न केलेली बरी, असे शरद पवार म्हणाले.


Post a Comment

0 Comments