राज्य सरकाराला दिलासा;हरित लवादाने लावलेल्या १२ हजार कोटींच्या दंडाला सुप्रीम कोर्टाने केले स्थगित...
मुंबई : राज्य सरकारला हरित लवादाने लावलेल्या १२ हजार कोटींच्या दंडावर आता सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. यामुळे आता राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. घनकचरा व्यवस्थापना प्रकरणी राज्य सरकारला हरित लवादाने १२ हजार कोटींचा दंड ठोठावला होता.या दंडा प्रकरणी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती, याला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
पुढची सुनावणी होणार आहे, तत्पुर्वी याचिकाकर्त्यांना नोटीसा जारी केल्या आहेत. या नोटीसांना उत्तर मिळाल्यानंतर ही सुनावणी होणार आहे.पुढची सुनावणी होईपर्यंत राज्य सरकारला हा दिलासा मिळाला आहे. घनकचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनासाठी पर्यावरणीय नुकसान भरपाई म्हणून महाराष्ट्र सरकारला १२,००० कोटी रुपये दंड देण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाला आव्हान देत महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. आता यात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिलासा दिला आहे. या दंडाला स्थगिती दिले आहेत.
Post a Comment
0 Comments