Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

विनयभंगाच्या प्रकरणाशी महावितरणचा संबंध नाही ; महावितरणाने केले स्पष्ट...

विनयभंगाच्या प्रकरणाशी महावितरणचा संबंध नाही ; महावितरणाने केले स्पष्ट...

पुणे :- महावितरणच्या रास्ता पेठेतील कार्यालयात एका अपंग महिलेशी गैरवर्तन केल्या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधीत महिला ही त्या कार्यालयात लिपीक म्हणून काम करते तर आरोपी हे अधिक्षक अभियंता या पदावर आहेत.या सर्व प्रकारावर महावितरणक़डून लेखी स्पष्टीकरण देण्यात आले असून 'तो' प्रकार महावितरणशी संबंधित नाही असा निर्वाळा करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला अपंग असून, महावितरणच्या रास्ता पेठेतील कार्यालयात लिपिक आहेत. अधीक्षक अभियंता कुरसुंगे यांनी महिलेच्या कामात चुका काढून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली.महिला दिव्यांग असल्याने तिची दुसऱ्या कार्यालयात बदली करण्याची धमकी देऊन अश्लील वर्तन केले. तक्रारदार महिला अपंग असल्याने सहकारी बोंद्रे, धावरे यांनी त्यांचा तिरस्कार केला.

त्यांना त्रास दिला. धावरे याने महिलेच्या खुर्चीवर खाज येणारी भुकटी टाकली. भुकटीमुळे महिलेला त्रास झाला. या प्रकरणी अधीक्षक अभियंता प्रकाश कुरसुंगे (वय ४८ रा. विमाननगर), महिला आरोपी (वय ३६ रा. कोथरुड), विकास धावरे (वय ३० रा. धायरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावर भाष्य करताना महावितरण यांनी लेखी स्पष्टीकरण दिले असून , एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी अधीक्षक अभियंता व दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध रास्तापेठ येथील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र हा प्रकार आणि अभियंता व कर्मचारी देखील महावितरणशी संबंधित नाही. काही वृत्तपत्रांमध्ये विनयभंग प्रकरणी महावितरणचा उल्लेख करण्यात आल्यामुळे हा खुलासा करण्यात आला असल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले आहे.या प्रकरणातील आरोपी कर्मचारी नेमके कुठले होते याचे स्पष्टीकरण मात्र महावितरणाने दिले नाही.

Post a Comment

0 Comments