पुणे धनकवडीतील एका दहशत माजवणाऱ्या गुंडावर 'एमपीडीए' ची कारवाई...पुणे : धनकवडी भागात दहशत माजवणाऱ्या गुंडाविरोधात पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार गुंडाला वर्षभरासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.
विकास उर्फ विकी रोहिदास फुंदे (३६, रा. चव्हाणनगर, धनकवडी) असे कारवाई केलेल्या केलेल्या गुंडाचे नाव आहे. फुंदे याची नागपूर येथील कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. फुंदेविरोधात खुनाचा प्रयत्न, घरफोडी, शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक पोलिसांकडे तक्रार करत नव्हते. त्याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे प्रतिबंधक शाखेचे निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी तयार केला होता.
संबंधित प्रस्तावाला पोलिस आयुक्तांनी मंजुरी दिली. रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यापासून शहरातील ५७ गुंडांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे.
Post a Comment
0 Comments