तरुणाच्या डोक्यात फरशी घालून केला तरुणास खून पुणे मंगळवार पेठेतील घटना...
पुणे : पूर्ववैमनस्यातून दोघांनी तरुणाच्या डोक्यात फरशी व उखळ घालून निर्घुण खून केल्याचा प्रकार मंगळवार पेठेत पहाटे घडल्याचे उघड झाले आहे. प्रतिक ऊर्फ लल्या कांबळे (रा. मंगळवार पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रात्री साडेअकरा वाजता सार्वजनिक स्वच्छतागृहात जात होते. यावेळी प्रतिक व त्याच्या मित्रांनी त्यांना दारू आणण्यास घेऊन गेले. दारु घेऊन ते पुन्हा मंगळवार पेठेत घराजवळ आले. प्रतिक याला दारु जास्त झाली होती. खूप उशीर झाल्याने फिर्यादी गोकुळ चव्हाण याने त्याला घरी जाण्यास सांगितले. तेव्हा तो व ऋतिक दिवटे हे लाकडी वखारीजवळ लघवी करत असताना अचानक त्यांच्या ओळखीचे सोनू पाटोळे व आयुष सोनवणे तेथे आले. सोनू याने हातातील फरशी जोरात प्रतिक याच्या डोक्यात मारली. फरशी डोक्यात लागल्याने प्रतिक जागेवरच पडला. गोकुळ याने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने सोड मला, मी खूप वैतागलो आहे, मला काय त्रास आहे, मलाच माहिती, असे बोलत असताना आयुष सोनवणे याने प्रतिकला फरशी मारली. हे पाहून ऋतिक दिवटे पळून गेला. पाटोळेने संडासाजवळ कबूतरांना पाण्यासाठी असलेली ऊखळ घेऊन ती उचलून प्रतिक याच्या डोक्यात घातली. त्यामुळे त्याचे डोके फुटून त्याचा जागीच मृत्यु झाला. फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक मंगेश जगताप अधिक तपास करीत आहेत.
Post a Comment
0 Comments