Type Here to Get Search Results !

पाच वर्षाच्या दोन मुला मुलीवर लैंगिक अत्याचार, २८ वर्षीय नराधमा विरोधात पुण्यात गुन्हा दाखल...

पाच वर्षाच्या दोन मुला मुलीवर लैंगिक अत्याचार, २८ वर्षीय नराधमा विरोधात पुण्यात गुन्हा दाखल...

पुणे : शहरात दिवसेंदिवस लहान मुलांच्या लैंगिक छळाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सांगवी येथील सांडस येथे ५ वर्षाच्या मुलासह मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका २८ वर्षीय नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शनिवारी (२५ नोव्हेंबर) संध्याकाळी चार ते पाचच्या सुमारास आरोपीच्या घरात घडली. याप्रकरणी पीडित मुलांच्या २९ वर्षीय आईने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वप्निल ढमढेरे उर्फ तात्या (२८, रा. सांगवी सांडस, ता. हवेली) याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पाच वर्षाचा मुलगा व मुलगी घराच्या अंगणात खेळत होते. त्यावेळी आरोपी स्वप्नील हा त्यांना त्याच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने मुलांना मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवले. त्यानंतर फिर्यादी यांच्या पाच वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार पिडित मुलांच्या आईला समजल्यानंतर त्यांनी रविवारी लोणीकंद पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भदे या करत आहेत.

Post a Comment

0 Comments