Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

अश्लील व्हिडीओ तयार करण्यास महिलेवर केली जबरदस्ती ; 3 अभिनेत्यांना अटक; धक्कादायक प्रकाराने वाढली खळबळ

अश्लील व्हिडीओ तयार करण्यास महिलेवर केली जबरदस्ती  ;  3 अभिनेत्यांना अटक; धक्कादायक प्रकाराने वाढली खळबळ...

मुंबई | 07 नोव्हेंबर 2023 : पॉर्नोग्राफी सिनेमांचं चित्रीकरण आणि लाईव्ह-स्ट्रीमिंग केल्याप्रकरणी रविवारी तीन अभिनेत्यांना अटक करण्यात आली आहे. पिहू नावाच्या आधारित ॲपवर पोर्नोग्राफिक सिनेमे प्रदर्शित करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

पिहू या प्लॅटफॉर्मवरील व्हिडीओ पाहण्यासाठी निर्मात्यांद्वारे दर महिन्याला युजर्सकडून पैसे आकारले जात असल्याची माहिती देखील समोर येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपासणी करत आहेत.

वर्सोवा पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये 20 आणि 34 वयोगटातील दोन महिला आणि 27 वयोगटातील एक पुरुष आहे. संबंधीत आरोपी पिहू या प्लॅटफॉर्म अश्लील व्हिडीओ अपलोड करत होते. एवढंच नाही तर, लोक महिलांसोबत व्हिडीओ, ऑडीओ कॉलवर देखील बोलू शकत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

काही आठवड्यांपूर्वी अंधेरी पश्चिम येथून पॉर्नोग्राफी व्हिडीओ शूट होत असल्याची माहिती स्थानिक माहितीदारांद्वारे पोलिसांनी मिळाली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. रविवारी अंधेरी पश्चिम येथील एका बंगल्यात सुरू असलेल्या शूटिंगबद्दल पोलिसांनी कळताच त्यांनी घटनास्थळी छापा टाकला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘इंस्टाग्रामच्या माध्यमातून स्ट्रीमिंग शेड्यूलची माहिती युजर्सना मिळायची. यासाठी युजर्सना ऍपमधील काही कॉईन्स खरेदी करावी लागत होती. ज्यामुळे ऍपवर अपलोड होणारे व्हिडीओ युजर्सना पाहता येतील. एवढंच नाही तर, ऍपवर प्रोफाईल असलेल्या युजर्सना महिलांकडून ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल सारख्या सेवा देखील मिळत होत्या…’ अशी माहिती वर्सोवा पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणातील सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याची देखील माहिती मिळत आहे. ‘ऍपवरील युजर्स पैसे कुठे जमा करत होते, याची चौकशी सध्या आम्ही करत आहोत. याबद्दल अधिक चौकशी सुरु आहे…’ अशी माहिती पोलिसांनी दिला आहे.

विशेषत: ऍपसाठी महिला त्यांच्या इच्छेने काम करत होत्या, की त्यांना अस काम करण्यास भाग पाडलं जात होतं… याची चौकशी देखील पोलिस करत असल्याची माहिती मिळत आहे. संबंधीत प्रकरणामुळे सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे. महत्त्वाचं म्हणजे पिहू ॲप गुगल स्टोर आणि ऑपल स्टोरमधूम काढण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.

Post a Comment

0 Comments