Type Here to Get Search Results !

शुबमन गिलच्या झेलवर सारा तेंडुलकरांची 'स्पेशल' रिअँक्शन...

 शुबमन गिलच्या झेलवर सारा तेंडुलकरांची 'स्पेशल' रिअँक्शन...

भारताचा विश्वचषकातील चौथा सामना बांगलादेश विरुद्ध पुण्यातील MCA स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही आली आहे.

पुणे ;- सारा तेंडुलकर भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये दाखल झाली आहे. बांगलादेश विरुद्ध आपल्या संघाला चीअर करताना ती अनेक वेळा दिसली. सारा तेंडुलकर आणि भारताचा सलामीवीर शुबमन गिल यांच्या अफेअरच्या अनेकदा चर्चा झाल्या आहेत. तशातच आज गिलने सामन्यात एक झेल घेतला. त्यावेळी कॅमेरा साराकडे गेला आणि अपेक्षित चर्चाही रंगली.

भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने भारताची पाचवी विकेट मिळवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने तौहीद हाएदचा झेल घेतला. त्याच्या या झेलामुळे बांगलादेशचा निम्मा संघ बाद झाला. शुभमन गिलने शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर तौहीदचा झेल घेतला तेव्हा स्टँडवर बसलेल्या सारा तेंडुलकरने टाळ्यांचा कडकडाट केला.

#timesofmaharashtranews #timesofmaharashtra #timesofmaharashtramas

Post a Comment

0 Comments