Type Here to Get Search Results !

इमिटेशन दागिने चोरणारे आरोपींना अटक ; लाखोंची दागिने जप्त...


इमिटेशन दागिने चोरणारे आरोपींना अटक ; लाखोंची दागिने जप्त...

अहमदनगर ;- कापड बाजारातील मोची गल्ली येथील दुकानात इमिटेशन ज्वेलरी चोरी करणाऱ्या पाच कामगारांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. दुकानामध्ये काम करणाऱ्या कामगारांनीच तीन लाख रुपये किमतीची ज्वेलरी चोरी केली होती.

चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. न्यायालयाने पाचही आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पप्पु राजु पारधे (वय ३२ वर्ष, रा. अबेट पंपामागे, रामवाडी,.नगर), आरबाज अब्बु शेख (वय २३ वर्ष, रा. मिलींद कॉलनी, आलमगीर, अ.नगर), रोहन बाळकृष्ण कोंडके (वय २३ वर्ष, रा. दातरंगेमळा, नेप्ती नाका,.नगर), निखील राजु भिंगारे (वय २४ वर्ष, जेजे गल्ली, मंगलगेट,.नगर), आकाश बाळासाहेब लावंडे (वय २१ वर्ष, जेजेगल्ली, मंगलगेट, नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मोचीगल्लीतील कॉस्मेटीक शॉपमधून इमिटेशन ज्वेलरी चोरी गेल्याची फिर्याद २८ ऑक्टोंबर २०२३ रोजी प्रकाश वासुदेव सचदेव (वय ४७ वर्षे, धंदा व्यापार रा. परिचय हॉटेलच्या मागे मैजिस्टीक टॉवर, प्लैट नं. ६०४ सी विंग, सावेडी नगर) यांनी दिली होती. गुन्ह्याचा तपास करीत असताना दुकानातील कामगारांनीच ही ज्वेलरी चोरी केल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. पाचही कामगारांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास मपोना वंदना काळे करत आहेत.

पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोहेकाँ तनविर शेख, पोहेकाँ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना ए पी इनामदार, मपोना वंदना काळे, पोना योगेश खामकर, पोना सलीम शेख पोकाँ अमोल गाढे, पोकॉ अभय कदम, पोकॉ संदिप थोरात, पोकॉ कैलास शिरसाठ, पोकाँ सोमनाथ राउत, पोकों सुजय हिवाळे, पोकॉ अतुल काजळे, मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


Post a Comment

0 Comments