पुणे क्राईम : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून एकाची तीन गोळ्या झाडून हत्या...
पुणे क्राईम : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी मध्यरात्री अशीच एक खळबळजनक घटना खडक परिसरात घडली. घोरपडे पेठेत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात काही हल्लेखोर मध्यरात्रीच्या सुमारास घुसले.
यावेळी झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर पाठोपाठ तीन गोळ्याचा झाडून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून नागरिक घाबरले आहे. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले.
अनिल साहू (वय ३५) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अनिल साहू हा घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज चौकात राहायला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अनिल साहू हा त्याच्या घरी झोपला होता. यावेळी त्याच्या घरात त्याचे कुटुंबीय देखील झोपले होते. मध्यरात्री २ च्या सुमारास एक हल्लेखोर त्याच्या घरी घुसला. त्याने अनिल साहूवर एकापाठोपाठ एक तीन गोळ्या झाडल्या.आणि त्याचा खून केला. यानंतर हल्लेखोर हा फरार झाला. गोलिबाराच्या आवाजाने साहू कुटुंबीय जागे झाले. त्यांना अनिल साहू हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेले. मात्र, अनिल साहू याचा आधीच मृत्यू झाला होता.
Post a Comment
0 Comments