Type Here to Get Search Results !

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक सुरक्षा विभागाने जुगार अड्डयावर छापा टाकुन २४ इसमांवर कारवाई करून ६३,९५०/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त ; हडपसर पोलिसांचे अवैध धंद्यांकडे सर्रासपणे दुर्लक्ष...

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक सुरक्षा विभागाने जुगार अड्डयावर छापा टाकुन २४ इसमांवर कारवाई करून ६३,९५०/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त ; हडपसर पोलिसांचे अवैध धंद्यांकडे सर्रासपणे दुर्लक्ष...

पुणे :- दि. १४.०३.२०२३ रोजी शिवशक्ती चौक, भेकराईनगर, हडपसर, पुणे परीसरात काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली.

सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता, काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने २२ इसमांना ताब्यात घेवुन, त्यांचेकडून जुगारातील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकुण ६३,९५०/- रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व दोन पाहिजे आरोपी अशा २४ इसमां विरूध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गुरनं. ४२७ / २०२३ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

परंतु या भागात स्थानिक हडपसर पोलिसांचे अश्या अनेक धंद्यांकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.

सदरची कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त गुन्हे अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार बाबा कर्पे, अजय राणे, इरफान पठाण, हणमंत कांबळे, इम्रान नदाफ, संदीप कोळगे, अमित जमदाडे, ओंकार कुंभार या पथकाने यशस्वी केली आहे.

Post a Comment

0 Comments