Type Here to Get Search Results !

पुणे घोरपडे पेठेतील रेशनिंग दुकानदारांकडून गोरगरीब जनतेची धान्याची चोरी..! नागरिकांची कारवाईची मागणी...

पुणे घोरपडे पेठेतील रेशनिंग दुकानदारांकडून गोरगरीब जनतेचे धान्याची चोरी..! नागरिकांची कारवाईची मागणी...
अंत्योदय शिधापत्रिकेवर ३५ किलो धान्य असताना फक्त दिला जातोय २९ किलोच...

पुणे :- शहरातील घोरपडे पेठेतील रेशनिंग दुकानदाराकडून थेट नागरिकांच्या धान्यावरच डल्ला मारला जात असल्याचे समोर आले आहे. घोरपडे पेठ हा झोपडपट्टयाने व्यापलेला असून तेथे अनेक गोरगरीब,कष्टकरी राहण्यासाठी आहेत. परंतु कष्टकरी लोकांच्या हक्काचा घास काही दुकानदार पळवून काळ्या बाजारात विकत आहेत? घोरपडे पेठेतील गॅलेक्सी बिल्डिंग मध्ये फरीद शेख यांची स्वस्त धान्य दुकान असून त्या दुकानातून धान्य घेण्यासाठी नागरिकांची भलीमोठी रांग धान्य घेण्यासाठी थांबलेली दिसते, परंतु आतील कारभार जनतेला दिसत नसल्याने अंधभक्त अधिकारी लांबच राहतात?
लोहियानगर मधील एका महिलेचे अंत्योदय रेशनिंग कार्ड असून त्या कार्डावर नियमानुसार ३५ किलो धान्य मिळणे बंधनकारक आहे. तर दरमहा मोफत साखर मिळते आणि अजूनही मोफतचे तांदूळ चालूच आहे. परंतु सदरील स्वत धान्य दुकानदार २० किलो तांदूळ व ९ किलो गहू देत असून दरमहा मिळणारे मोफतचे तांदूळ स्वताच्या घशात घालून साखरेवर देखील डल्ला मारला आहे. गेल्या २ महिन्यांपासून मोफतचे धान्य दिले नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. दरमहा ६ किलो व मोफतचे २० किलो असे धान्य पचविणा-या चोर दुकानदारावर अन्न धान्य वितरण अधिकारी कारवाई करणार का? असा प्रश्न कष्टकरी गोरगरीब नागरिकांनी विचारला आहे. तर त्या दुकानदाराकडील प्रत्येक ग्राहकाला वापट केलेल्या धान्याची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग झोन अधिकारी लक्ष्मण माने यांना फोन केला असता ते मुंबई येथे कामानिमित्ताने असल्याचे सांगितले व एस.आय हे फोन करतील असे बोललेले आहेत.

Post a Comment

0 Comments