Type Here to Get Search Results !

प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त पुण्यात सिरत कमिटीच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रमांचे आयोजन...

प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त पुण्यात सिरत कमिटीच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रमांचे आयोजन...

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख) प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त पुणे शहर सिरत कमिटीचे वतीने वेगवेगळे उपक्रम राबविले गेले. बुधवारी 5 ऑक्टोबर रोजी लेडी हवाबाई शाळा पुणे कॅम्प या ठिकाणी रक्तदान शिबिर तसेच मोफत आरोग्य शिबीर व नेत्र तपासणी शिबीर देखील असे अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरामध्ये सुमारे 100 पेक्षा अधिक लोकांनी रक्तदान केले. या कार्यक्रमात मा.आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Joint Commissioner Of Police), पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP), सहाय्यक पोलीस आयुक्त आर एन राजे (ACP), वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम (Sr. Police Inspector)लष्कर पोलीस ठाणे, अभय छाजेड, मा नगरसेवक रईस सुंडके, शिक्षण मंडळ सदस्य नुरुद्दीन अली सोमजी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या शिबिराला भेट दिली. तसेच सिरत कमिटीचे अध्यक्ष मौलाना गुलाम अहमद, सचिव सिराज बागवान, मुन्नव्वर कुरेशी, आसिफ शेख, नदीम मुजावर मुस्ताक अहमद, अहमद सय्यद, हाजी शाहिद साबीर, जाहीद शेख, इकबाल मुलानी, नजीर तांबोळी व आदी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन पाहिले. कार्यक्रमाचा सर्व मान्यवरांनी कौतुक केले. राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यासाठी सदर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी जयंतीनिमित्त सीरत कमिटीचे वतीने आयोजित करण्यात येते. या कार्यक्रमांमध्ये सीरत कमिटीचे सरचिटणीस रफीउद्दीन शेख यांनी आव्हान केले की यंदाच्या मिरवणूक मध्ये तरुण मुलांनी कोणताही धांगडधिंगा न करता शांततेने मिरवणुकीत सामील व्हावे आणि शक्य असेल तर डीजे चा वापर करू नये जेणेकरून इतर लोकांना डीजेचा त्रास होईल व इतरांना त्रास सहन करावा लागेल असे आवाहन केले.

बातम्यांसाठी व जाहिरातींसाठी संपर्क.
संपादक मुज्जम्मील शेख
7507737313 / 7887776668

Post a Comment

0 Comments