Type Here to Get Search Results !

भारत जोडो यात्रेला कर्नाटकात लागले गालबोट...मुस्लिम समाज काँग्रेसवर नाराज ;- शेहजादे सय्यद मन्सूर अली(वंशज टिपू सुलतान)

भारत जोडो यात्रेला कर्नाटकात लागले गालबोट...
मुस्लिम समाज काँग्रेसवर नाराज ;- तहेरीके खुदादाद राष्ट्रीय अध्यक्ष शेहजादे सय्यद मन्सूर अली (वंशज टिपू सुलतान)
मैसूरचे राजे शहीद टिपू सुलतान यांच्या दर्ग्याला भेट न दिल्यामुळे गांधी कुटुंबावर सुलतान कुटुंब नाराज...
पुणे :- सध्या काँग्रेस पक्षाचे भारत जोडो पदयात्रा सुरू आहे. काही प्रमाणावर हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडत असताना त्यामध्ये गालबोट लागण्याचे काम झाले आहे. राहुल गांधी जेव्हा कर्नाटकातील श्रीरंगपटनम मंदिर आणि चर्चला भेट दिली. त्याच ठिकाणी मुस्लिम समाजाचे वीर सेनानी शहिद टिपू सुलतान यांची त्या ठिकाणी अवघ्या ३ किमी अंतरावर शाही गुंबज समाधी होती. तरी त्यांनी का भेट दिली नाही. हजरत टिपू सुलतान शहीद यांचे काँग्रेसला मुस्लिमांची मते हवी असताना आठवणीत येतात. तर आज का श्रीरंगपटन मध्ये येऊन का आठवणीत आले नाही. त्यांनी शहीद टिपू सुलतान यांचा अपमान केला असल्याचं टिपू सुलतान यांचे वंशज साहेब जादे सय्यद मन्सूर आली यांनी सांगितले आहे.
तसेच त्यांनी सांगितले की, 1974 मध्ये इंदिरा गांधी यांना इमर्जन्सीच्या वेळी त्या अडचणीत असताना त्यांनी टिपू सुलतान यांच्या दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतले होते. व त्यानंतर त्यांनी इंडियन मुस्लिम कॉन्फरन्स असे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यानंतर इमर्जन्सीची परिस्थिती नियंत्रित झाली होती. तसेच त्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त करताना सांगितले की, रेहमान खान 2012 मध्ये टिपू विद्यापीठ बनवुन देणार असल्याची खेळी खेळले पण ते अयशस्वी झाला. मुस्लिमांचा विश्वास संपादन करण्यासाठी 2015 मध्ये माजी मुख्यमंत्री सिद्रामैय्या यांनी टिपू सुलतान यांची जयंती साजरी केली. आणि ज्यावेळेस भाजपा सरकार सत्तेत आले त्यांनी जयंती बंद केली त्याचा कुठेही विरोध दर्शविला नाही. आता राहुल गांधींनी दुर्लक्ष करून मुस्लिम महापुरुषांचा अपमान केला आहे. "जो शहीद टिपू सुलतान नही वो हमारे नही" असे त्यांनी सांगितले आहे.
या काँग्रेसच्या चुकीमुळे कर्नाटकच नाही तर संपूर्ण भारतभर या गोष्टीचा पडसाद उमटणार आहे असे चित्र सध्या देशात दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments