Type Here to Get Search Results !

वाहन तसेच मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद...

वाहन तसेच मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद... 
पुणे ;-  दि.17/04/2022 रोजी फिर्यादी यांची यामाहा आर.एक्स.135 आरटीओ नं.एम.एच.13/के/7301 ही लाल  रंगाची ही त्यांचे राहते घरासमोर लॉक व पार्क करून ठेवली असता,ती कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करून नेल्या बाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे गु.र.नं.375/2022, भा.दं.वि.कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हयाचे अनुशंगाने कोंढवा तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक स्वप्निल पाटील व तपास पथकातील अंमलदार ज्ञानेश्वर भोसले व सुजित मदन यांना दोन संशयीत इसम हे पर्पल रंगाच्या होंडा अॅक्टीवा दुचाकी गाडी नं.एम.पी.09/एस.डब्ल्यु.0285 हिचेवरून शिवनेरीनगर गल्ली नं.30 चे आसपास कोणतातरी स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या हेतुने परिसराची तसेच गाड्यांची टेहाळणी करीत फिरत असल्याची माहिती गोपनिय बातमीदारा मार्फत मिळाल्याने तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी सदर इसमांचा शोध घेवून आरोपी नामे 1)यश सागर ओंबळे, वय 21 वर्षे, रा.यशवंत नगर, तलेसरा हॉस्पीटल मागे,येरवडा,पुणे 2) पृथ्वीसिंग नारंगसिंग गिल,वय 24 वर्षे, रा.स.नं.14, जय जवान नगर,येरवडा,पुणे यांना मोठया शिताफीने ताब्यात घेवून,त्यांचेकडून एकुण सात दुचाकी गाड्या, दहा मोबाईल फोन, दोन लॅपटॉप, दोन अँपल कंपनीचे आय-पॅड असा एकुण 3,60,500/- रू किंचा मुद्देमाल हस्तगत करून खालीलप्रमाणे एकुण 15 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
कोंढवा पोलीस स्टेशन कडील :- 
1) 375/2022 भा.दं.वि. कलम 379 
2) 851/2022 भा.दं.वि. कलम 379
3) 901/2022 भा.दं.वि. कलम 379 
4) 955/2022 भा.दं.वि. कलम 379 
हिंजवडी पोलीस स्टेशन कडील :-
1) 804/2022 भा.दं.वि.कलम 380,34 
2) 803/2022 भा.दं.वि. कलम 379
3) 836/2022 भा.दं.वि. कलम 380 
4) 883/2022 भा.दं.वि. कलम 380 
वानवडी पोलीस स्टेशन कडील :-
1) 392/2022 भा.दं.वि. कलम 379 
2) 391/2022 भा.दं.वि. कलम 379 
हडपसर पोलीस स्टेशन कडील :- 
1) गु.र.नं. 1171/2022 भा.दं.वि. कलम 379
चर्तु:श्रुंगी पोलीस स्टेशन कडील :- 
1) गु.र.नं. 373/2022 भादवि 379
स्वारेगट पोलीस स्टेशन कडील :- 
1) गु.र.नं. 197/2022 भा.दं.वि. कलम 379
विमानतळ पोलीस स्टेशन कडील :- 
1) गु.र.नं. 327/2022 भादंवि कलम 379 
विश्रांतवाडी पोलीस स्टेशन कडील :- 
1) गु.र.नं. 71/2022 भा.दं.वि. कलम 379 सदरची उल्लेखनीय कामगिरी ही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-5 नम्रता पाटील, सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पोर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन, सरदार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, जोतीबा पवार, तुषार आल्हाट, गोरखनाथ चिनके, निलेश देसाई, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सागर भोसले, सुजित मदन यांच्या पथकाने केली आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या सर्व पथकाचे पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments