Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

नवीन कोरोना व्हायरस अधिक धोकादायक : WHO ने सांगितले नवीन कोरोना व्हेरिएंट अतिशय चिंतेचा...

नवीन कोरोना व्हायरस अधिक धोकादायक : WHO ने सांगितले नवीन कोरोना व्हेरिएंट अतिशय चिंतेचा...

पुणे :- गेल्या काही दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेत कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली. त्यातच नवीन व्हेरिएंट आढळल्याचे तज्ञांच्या लक्षात आले. वायरोलॉजिस्ट टय़ुलिओ जी ओटिवेरा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय चिंतेचा असल्याचे घोषित केले आहे. या नव्या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेनं ओमिक्रॉन (B.1.1.529) असे नाव दिले आहे. ओमिक्रॉन हा धोकादायक व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन होतो .

कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचे दक्षिण आफ्रिकेत 6, हाँगकाँगमध्ये 1, बोटस्वानामध्ये 3 आणि इस्रायल, बेल्जियममध्येही रुग्ण आढळून आले.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) सद्या याची खूप भीती असल्याचे समजले जात आहे.
दक्षिण आफ्रिकेत नवीन व्हेरिएंट आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना अलर्ट झाली. गुरुवारी तातडीने बैठक घेण्यात आली. या व्हेरिएंटमध्ये मोठय़ा प्रमाणात संख्येने म्युटेशन होत आहे (अंतर्गत संरचना बदलत राहण्याची क्षमता तसेच सतत रूप बदलणे). जेव्हा मोठय़ा प्रमाणावर म्युटेशन होते तेव्हा विषाणू नक्की कसा परिणाम करणार हे सांगता येणे कठीण असते असे जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ञ मारिया वेन केरकोव यांनी सांगितले. नवीन व्हेरिएंटचा अभ्यास सुरू आहे.

बऱ्याच देशांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी...
दक्षिण अफ्रीकेतून विमान प्रवास ऑस्ट्रिया, कनाडा, जर्मनी, ब्रिटेन, अमेरिका, इटली, इजरायल व नीदरलैंड समवेत बऱ्याच देशांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास बंद करण्यात आले आहे.

शेअर बाजारही घाबरला...
आफ्रिकन कोरोनाचा शेअर बाजारानेही मोठा धसका घेतल्याचे शुक्रवारी दिसले. दिवसभरात बीएसई तब्बल 1687.94 अंकांनी घसरून 57,107.15 अंकांवर बंद झाला. यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 7.35 लाख कोटी रुपये बुडाले.

भारतीय रुपयाही घसरला...
कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टचा फटका रुपयालाही बसला. डॉलरच्या तुलनेत रुपया आज तब्बल 37 पैशांनी घसरला.

50 प्रकारचे म्युटेशनची क्षमता...
(B.1.1.529) हा व्हेरिएंट जगाची चिंता अधिकच वाढवणारा आहे. कारण त्यात तब्बल 50 प्रकारचे म्युटेशन आढळून आले आहे. तसेच या व्हेरिएंटमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने पसरण्याचा, लागण झाल्यास रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळण्याचा धोका आहे.

नव्या व्हेरिएंटवर लससुद्धा शून्यकामी...
(B.1.1.529) हा विषाणू अत्यंत वेगाने पसरत आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर कोरोनाची लसदेखील कुचकामी ठरत आहे.

आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचा दिला इशारा...
(B.1.1.529) हा नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर भारतातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
(मुज्जम्मील शेख)

Post a Comment

0 Comments