Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग न्युज ;- परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस...

टाईम्स ऑफ महाराष्ट्र ब्युरो :- शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालय (ED) म्हणजेच ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेना (MP) खासदार संजय राऊत यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे.

(Central Minister) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान (CM) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय आणि आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून त्यांच्या विरोधात नाशिक, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी राणे यांना अटक केली होती. राणेंच्या अटकेत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीच भूमिका होती, त्यांनीच पोलिसांवर दबाव टाकला, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. आता त्यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावल्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा तापणार आहे.

अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली असून आता त्यांना ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. शंभर कोटी रुपयांच्या कथित वसुली संदर्भात ईडीने अनिल परब यांना ही नोटीस बजावली आहे.

याबाबतची माहिती देताना संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. शाब्बास! जनआशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. कृपया घटनाक्रम समजून घ्या. कायद्याची लढाई कायद्यानेच लढू, जय महाराष्ट्र, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


#ChiefMinister #UddhavThakare  #CentralMinister #NarayanRane #AnilParab #Mumbai #EDnotice #Timesofmaharashtra #Shivsena

Post a Comment

0 Comments