लंडन : देशासह जगात करोना लाट जरी ओसरत असली तरी धोका मात्र पूर्णपणे टळलेला नाही. कारण करोनातुन मुक्त होणाऱ्या रुग्णांना बुरशीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. आतापर्यंत रुग्णांना काळी,पांढरी, आणि पिवळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. यातच करोना लढाई सुरु असतांनाच ब्रिटन येथे आणखी एक नवा विषाणू सापडला आहे.
विदेशी वृत्त वाहिन्यांच्या माहितीनुसार, ब्रिटनमधील नॉर्थ वेल्समध्ये एकाच कुटुंबीतील दोन व्यक्तींना मंकीपॉक्स झाला आहे. सर्वसामान्यांन्या या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. तसेच हा विषाणू परदेशातून ब्रिटनमध्ये आल्याचा दावाही आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.
या आजारमध्ये रुग्णांचा शरीरावर सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरावर पुरळ येतात. त्यानंतर ते संपूर्ण शरीरावर पसरतात. आजारादरम्यान, रॅशेस तांबड्या रंगाचे होतात. अखेर या चट्ट्यांचे पापुद्रे बनून शरीरावरून गळून पडतात. तसेच रुग्णाला या आजारात ताप, डोकेदुखी, कंबरदुखी, स्नायू आखडणे आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात. याबाबत डब्ल्यूएचओच्या माहिती दिली आहे की,’या आजारामधील मृत्यूदर हा तब्बल ११ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र दिलासादायक बाब म्हणजे देवीपासून वाचवणारी लस ही मंकीपॉक्सवरही परिणामकारक आहे.’
Post a Comment
0 Comments