Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

गरजूंच्या मदतीला धावून जाणारा 'देवदूत' योगेश ओगले

गरजूंच्या मदतीला धावून जाणारा 'देवदूत' योगेश ओगले

पुणे :- गरजूंच्या मदतीला धावून जाणारा 'देवदूत' म्हणून योगेश ओगले यांची अशी ओळख निर्माण झाली आहे. आतापर्यंत त्यांनी हजारो  गरजूंच्या मदतीसाठी धावून जाऊन "देवदूत" अशी त्यांची सर्वत्र ओळख आहे. 
गरजू लोकांसाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा असते पण त्यांच्यातले काहीजण मात्र खरोखरच उभे राहतात.आणि आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या एखाद्या कामासाठी झोकून देतात.असेच लोकांच्या अडचणीच्यावेळी मदतीसाठी धावून जाणारे योगेश ओगले गरजू नागरिकांसाठी देवदूतच आहेत.
महाराष्ट्र राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसागणिक चिंतेच्या वळणावर पोहोचत असतानाच राज्यातील नागरिकांना योगेश ओगले शक्य त्या सर्व परिंनी आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता दर दिवशी महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं रुग्णालयांतील सुविधा,रुग्णांसाठीचे बेड्स,प्लाझ्मा,वैद्यकीय मदत,वाढीव बिल,औषधांची उपलब्धता यांच्याबाबत विचारणा केली जात आहे. अशा परिस्थितीत नेमका कुठे आणि कोणाला संपर्क साधायचा याबाबतही काही नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. पण, गोंधळून जाण्याचं कारण नाही. कारण राज्याच्या कोणत्याही भागातून गरजू नागरिकांनी, कोणत्याही प्रकारच्या माहिती व मदतीसाठी लोकसंवाद हेल्पलाईन- ८९८३०४१९१२ या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

Post a Comment

0 Comments