पुणे : देशात कोरोनाव्हायरसची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रात तर आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनसारखेच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त चिंता आहे ती नोकरीची. पण आता टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे तुमचा पगार वाढणार आहे.
देशातील बहुतेक कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. अनेक कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. एका सर्वेक्षणानुसार अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याच्या विचारात आहेत.
स्टाफिंग कंपनी जीनियस कन्सल्टेंट्सने हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 ते 10 टक्क्यांची वाढ होऊ शकते. अनेक नोकरदार वर्गाची सॅलरी स्ट्रक्चर बदलू शकतं.
या सर्वेक्षणात देशातील 1200 कंपन्यांचा समावेश होता. यात HR, IT, ITES, BPO सहित बँकिंग अँड फायनान्स , कन्स्ट्रक्शन आणि इंजीनियरिंग, एज्युकेशन, लॉजिस्टिक हॉस्पिटॅलिटी, मीडिया, फार्मा, मेडिकल, पॉवर अँड एनर्जी, रियल एस्टेट यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
सर्वेक्षणात असलेल्या निम्म्यापेक्षा जास्त कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा विचार असल्याचं सांगितलं. जवळपास 59% कंपन्यांनी या वर्षात आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याची तयारी दर्शवली आहे. 20 टक्के कंपन्यांनी पगार वाढवणार पण 5% पेक्षा कमी वाढवणार असल्याचं म्हटलं. तर 21% कंपन्या मात्र 2021 वर्षात तरी पगार वाढवणार नाहीत.
अर्थव्यवस्थेत अपेक्षेपेक्षा जास्त सुधारणा, चांगलं मार्जिन, ग्राहकांचा विश्वास यामुळे कंपन्यांनी पगार वाढवण्यासाठी आपलं बजेटही वाढवलं आहे. सर्वेक्षणानुसार 20 टक्के कंपन्यांनी या वर्षी दोन अंकी पगार वाढवण्याची योजना आखली आहे. 2020 मध्ये हा आकडा फक्त 12 टक्के होता.
फक्त पगारवाढच नाही तर काही कंपन्या फ्रेशर्सनासुद्धा संधी देण्यासाठी इच्छुक आहेत.43 टक्के कंपन्यांनी फ्रेशर्सना संधी देऊ इच्छित आहेत. तर 41 टक्के कंपन्या अनुभवी कर्मचाऱ्यांना नोकरी देण्यास इच्छुक आहेत.
Post a Comment
0 Comments