स्वारगेट पोलीस स्टेशनची उत्तम कामगिरी, 24 तासाच्या आत केले पळून गेलेल्या आरोपीस जेरबंद...
पुणे :- दिनांक ०८/०१/२०२१ रोजी मुरुम पोलीस स्टेशन गु.र.नं.२५७/२०२० भा.द.वि.कलम ४६१,३८० मधील आरोपी रोहन ऊर्फ बंटी बिरु सोनटक्के, वय-२१ वर्षे, रा-यशदीप चौक वारजे माळवाडी, पुणे यास गुन्हयाचे तपासकामी मुरुम पोलीस स्टेशनचे अंमलदार यांनी येरवडा कारागृह येथुन ताब्यात घेवुन मुरुम उस्मानाबाद येथे घेवुन जाण्यासाठी स्वारगेट एस.टी.स्टॅन्ड येथे आले असता सदर आरोपीने पोलीसांना हिसका देवुन बेडी व दोरीसह पळुन गेला होता. म्हणुन सदरबाबत स्वारगेट पोलीस ठाणे गुन्हा रजि.०४/२०२१ भा.द.वि.कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ०९/०१/२०२१ रोजी स्वारगेट पोलीस ठाणे गुन्हा रजि.०४/२०२१ भा.द.वि.कलम २२४ प्रमाणे गुन्हयाचा तपास करीत असताना स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर व सोमनाथ जाधव पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सहा.पो.निरीक्षक, ए के रसाळ, पोउपनि जायभाय, पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग, जाधव, ज्यंबके, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ कांबळे, कुंभार, खोमणे, संदिप साळवे, दळवी, भोकरे, लखन ढावरे, मपोकॉ स्वाती जगताप असे तपास करीत असताना पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ कांबळे, संदिप साळवे यांना गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त माहितीव्दारे सदर
गुन्हयातील आरोपी नामे रोहन ऊर्फ बंटी बिरु सोनटक्के, वय-२१ वर्षे, रा-यशदीप चौक वारजे माळवाडी पुणे यास शिताफिने ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कामगिरी ही संजय शिंदे साहेब अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, सागर पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ - २ पुणे, सर्जेराव बाबर, स्वारगेट विभाग, पुणे बाळासाहेब कोपनर व सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरीक्षक, ए के रसाळ, पोउपनि जायभाय, पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग, जाधव, पोउपनि उयंबके, पोना कुंभार, पोना खोमणे, पोकॉ सोमनाथ कांबळे, पो कॉ संदिप साळवे, पो कॉ
दळवी, पो कॉ मोकरे, पोकॉ लखन ढावरे, मपोकॉ स्वाती जगताप यांचे पथकाने केलेली आहे.
Post a Comment
0 Comments