शरद पवार संतापले... राहुल गांधी यांच्या दुर्व्यवहाराबाबत योगी सरकार वर टीका...
टाईम्स ऑफ महाराष्ट्र ब्युरो : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संताप आहे. या बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांना गुरुवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. तिथे त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. घडलेल्या या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विटरद्वारे या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे.
Sharad Pawar Twitterशरद पवारांनी ट्वीटरच्या माध्यमातून युपी सरकारवर तोफ डागली आहे. ते म्हंटले की, “उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत अविवेकी व आतातायीपणाचे आहे. अशा पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणे, कायदा हातात घेणे निंदनीय आहे.”
प्रभू श्रीरामाचे नाव मुखी ठेवून कृती नथुरामाची करायची ही भाजपची वृत्ती पुन्हा समोर .
Post a Comment
0 Comments