Type Here to Get Search Results !

विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक पदी अक्षय दळवी यांची निवड...

विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक पदी अक्षय दळवी यांची निवड...
बीड - (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव तथा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ती सतत लढा उभारणारा अभ्यासू व्यक्तिमत्व अक्षय दळवी यांची विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक पदी निवड केल्याची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन यांनी केली आहे.
बीड सारख्या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ती सतत कार्य करून प्रदेश तसेच राष्ट्रीय पातळीवरती विद्यार्थ्यांच्या समस्यांना प्रभावीपणे मांडून त्यावरती उपाययोजना करण्याकरिता वेळप्रसंगी आंदोलनाच्या माध्यमातून देखील लढा उभारण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
अक्षय दळवी हे अगदी लहान वयापासूनच विद्यार्थ्यांच्या प्रश्न प्रति अत्यंत सजग व सोडविण्यासाठी आग्रही राहिले आहे, केरळ विधानसभेचे मार्फत आयोजित केलेल्या नॅशनल स्टुडंट पार्लमेंट या कार्यक्रमामध्ये केरळचे मुख्यमंत्री,विधानसभा अध्यक्ष,विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अक्षय दळवी यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.
नेहरू युवा केंद्र युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार राष्ट्रीय युवा कोर म्हणून बीड जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य केले असून युनिस्को मार्फत नेशनल पीस प्रोग्राम राबविणारे पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मधील भारतीय छात्र संसदेमध्ये भारतातील व जगभरातील आलेल्या प्रज्ञावंत व्यक्तींसमोर अक्षय दळवी यांनी आपले भ्रष्टाचार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व जातिवाद या विषयावरती अभ्यासपूर्ण प्रखर मत मांडून नावलौकिक मिळवलेला आहे. कोरणा सारख्या महामारी मध्ये ते सतत 110 दिवस दुर्बल व वंचित घटकातील व्यक्तींना मदत करून कार्य केले आहे.
पक्षीय पातळीवरती मराठवाड्याचे प्रभारी म्हणून ते कार्य करत असून त्यांनी परभणी येथे बेरोजगार यात्रा च्या माध्यमातून कार्य केलेले आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी मतदारसंघांमध्ये हे काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या जबाबदारी चे पालन करत त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्याकरिता मोठ्या प्रमाणावरती कार्य केलेले आहे. दिल्ली येथे विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रभारी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अक्षय दळवी यांचा गौरव झालेला आहे.
या सर्वांच्या माध्यमातून अक्षय दळवी यांची जडणघडण झालेली असून वडील हे वकील आहेत त्यांच्या आई गृहिणी असून एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या परिवारातून अक्षय दळवी यांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये आपली सुरुवात या माध्यमातून केली आहे बीडच्या भूमिपुत्राचे राष्ट्रीय राजकारणाच्या पदार्पणात बीड जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा दिले जात आहे.

Post a Comment

0 Comments