मुंबई :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबईतील कुर्ला विभागामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भक्तांच्या सुरक्षितेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सचिव अजय समगिर यांच्या तर्फे दि.२६ ऑगस्ट (बुधवार) रोजी मोफत सॅनिटायझर व स्टँडचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई या ठिकाणी पार पडले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, मुंबई अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष सोहेल सुभेदार व माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे यांच्या प्रमूख उपस्थितीमध्ये करण्यात आला.तसेच पुरंदर विधानसभेचे आमदार संजय जगताप व काही प्रमुख मान्यवर मंडळींनी सुद्धा या कार्यक्रमाला धावती भेट दिली.
अजय समगिर यांनी काही दिवसांपूर्वी सुद्धा त्यांच्या परिसरातील नागरिकांना मास चे वाटप केले होते व तसेच त्यांच्या परिसरात सॅनिटायझर फवारणी केली होती.
Post a Comment
0 Comments