Type Here to Get Search Results !

दौंड : खडकी गावामध्ये गरजू निराधार लोकांना मदतीचा हाथ...
दौंड :- खडकी गावामध्ये गरजू निराधार लोकांना मदतीचा हाथ...


देशावर कोरोना या विषाणूमुळे निर्माण झालेली गरीब लोकांवर आर्थिक परिस्थिती खालावली असून


खडकी गावामध्ये २०१ गरजू निराधार लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 


त्यामध्ये तांदूळ, गहू, तेल, शेंगदाणे, मीठ पुडा, मिर्ची पुडा, हळद पुडा, साखर,अंड्यांचा ट्रे व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.


ही संपुर्ण सामग्री दौंड पंचायत समितीचे मा.उपसभापती प्रकाश बाप्पू नवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक गणपत तात्या काळभोर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. त्यावेळी शब्बीर भाई पठाण, जावेद पठाण, रमेश मोरे, देवकांबळे भाऊसाहेब, पांढरपट्टे भाऊसाहेब, अनिल शिंदे भाऊसाहेब, दादा गुणवरे, कैलास कुदळे, लहुतात्या काळभोर, आदित्य मोहिते, हनुमंत काळभोर, तुषार काळे व आदी सहकारी मित्र उपस्थित होते.आणि वाटप करताना लाभार्थी यांनी सोशल डिस्टनसिंगचा व मस्कचा शासनाच्या आदेशाचे पालन केले आहे.


Post a Comment

0 Comments