कृष्णा गायकवाड प्रतिष्ठानाच्या वतीने जयंतीचा खर्च टाळून धान्य वाटप...
कृष्णा गायकवाड प्रतिष्ठान यांच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून येरवडा परिसरातील काही गरजु कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. आणि तसेच कृष्णा प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्वांना विनंती केली होती, की आपण आपल्या घरात राहून आपली जयंती साजरी करू आपण शासनाला मदत करू आणि आपल्या दारात द्वीप प्रज्वलन करून व दिवा लावुन डॉ.बाबासाहेबांना आपले अभिवादन व्यक्त करू त्याला संपूर्ण येरवडा परिसरातील व्यक्तींनी भरगोस प्रतिसाद दिला.
या वर्षी कोरोना या भयंकर विषाणुमुळे घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपापल्या घरी राहूनच साजरी केली आणि दरवर्षी जयंती निमित्त काहीना काही सामाजिक उपक्रम कृष्णा गायकवाड प्रतिष्ठान व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने राबविले जातात. यावर्षी जयंतीनिमित्त येरवडा परिसरात हे दोन उपक्रम राबविण्यात आले.
त्यावेळेस कृष्णा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष रुपेश कृष्णा गायकवाड, कोशल घोलप, योगेश बाराते, जावेदभाई इनामदार, राजेश गायकवाड, धनंजय बाराते, कृष्णा काकडे, नानु मॅनवेल, प्रमोद सुरंग, साहिल जगताप, गोपी निकाळजे,कट्टू बाराथे,ओंकार धोत्रे आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments