Type Here to Get Search Results !

चाकू हल्ल्यात झाला खाजगी दस्तलेखक ठार, आरोपी फरार वाशीम जिल्यातील घटना.

चाकू हल्ल्यात झाला खाजगी दस्तलेखक ठार, आरोपी फरार वाशीम जिल्यातील घटना...

वाशिम : एका खाजगी दस्तलेखकावर चाकू हल्ला झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कारंजा तहसील कार्यालय परिसरात १ मार्चला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली. हरिश्चंद्र विलास मेश्राम (३८) असे मृत्यू पावलेल्या दस्त लेखकाचे नाव असून तो कारंजा तालुक्यातील मेहा येथील रहिवासी आहे.

कारंजा तहसील कार्यालय परिसरात १ मार्च राेजी दुपारी दस्तलेखक आपले काम करीत असताना अचानकपणे एका अज्ञात इसमाने येऊन त्याच्या मानेवर चाकूने वार केले त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच त्याला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले , परंतु तपासणी दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची माहिती घेतली . दरम्यान वृत्त लिहेस्तोवर या संदर्भात पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती .चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला.

Post a Comment

0 Comments