Type Here to Get Search Results !

माजी सैनिकाच्या मुलाने जिंकली नेत्यांची मने...

माजी सैनिकाच्या मुलाने जिंकली नेत्यांची मने...
पुणे :- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने औरंगाबादचे सर्व सामान्य कुटुंबातील व एक माजी सैनिकाचा मुलगा प्रशांत कदम ह्या कार्यकर्त्याला मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी संधी देण्यात आली आहे. कदम हे मागील कार्यकारिणीत प्रदेश सरचिटणीस या पदावर कार्यरत होते. तसेच प्रदेशाध्यक्ष पदावर सुद्धा निलेश राऊत यांच्यानंतर सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी नेत्याला संधी देण्यात आली आहे. गव्हाणे हे यापूर्वी पिंपरी चिंचवडचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष व मागील काळात प्रदेश उपाध्यक्ष पदावर काम केलेले आहे. येणाऱ्या काळात सर्वसामान्य कार्यकर्ता घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मराठवाड्यात उभी करणार अस मत या सगळ्या प्रवासात माझे आई आणि वडील हे मला आदर्श स्थानी त्यांनी दिलेली शिकवण हे माझं मोठं भांडवल असेल अस मत प्रशांत कदम यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments