अंतिम वर्षाच्या परीक्षा देखील रद्द; राज्यशासनाचा सर्वात मोठा निर्णय...
मुंबई :- राज्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा संचारबंदीमुळे रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णय अद्याप झाला नव्हता. गेले कित्येक दिवस विविध पातळ्यांवर बैठका घेतल्या जात होत्या. परीक्षा होणार नसल्याची शक्यता होती आता मात्र त्यावर शिक्कामोर्तब झाले असून अंतिम वर्षाच्या परीक्षा शेवटी रद्द झाल्या आहेत. त्यामुळे अंतिम वर्षाच्या महाविद्यालयीन तरुणांना दिलासा मिळाला आहे. परीक्षा रद्द झाल्याची माहिती उच्चशिक्षण मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. उच्चशिक्षण घेत असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करायच्या कि नाही यावर मुख्यमंत्री, उच्चशिक्षण मंत्री आणि विद्यापीठांचे कुलगुरू यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली.
विद्यार्थ्याला श्रेणीवर आक्षेप असेल तर...
बरीच चर्चा झाल्यानंतर शेवटी सर्वांचे एकमत झाले आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार श्रेणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधीही या चर्चा झाल्या होत्या. जर एखाद्या विद्यार्थ्याला श्रेणीवर आक्षेप असेल तर तो विद्यार्थी परीक्षा देऊ शकेल त्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे तनपुरे यांनी सांगितले आहे. एकाही विद्यार्थ्याला प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेऊन परीक्षा पद्धत व वेळापत्रक ठरविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिले कॉलेजला आदेश...
सर्व वर्षांच्या गुणांचे मूल्यांकन करून अंतिम वर्षाची श्रेणी देण्यात यावी असे ठरविण्यात आले. जर श्रेणीत काही आक्षेप असेल तर परीक्षा घेण्यासाठी सर्व कायदेशीर बाजू तपासूनच त्या घेण्यात याव्या असे तसे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. कोरोना विषाणूला संधी समजून प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि नव्या शिक्षणपद्धती बाबतही संशोधन करावे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. शैक्षणिक विषमता दूर व्हावी यासाठीही प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.
सर डी एड दूत्तीय वारसांच्या पण का
ReplyDeleteजर विद्यार्थीने परीक्षा शुल्क भरले असल्यास ते परत मिळणार का?
ReplyDelete