Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

दौंडमधील कचऱ्याच्या समस्येकडे नगरपालिका व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष...

दौंड(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयूर साळवे) दौंड नगरपालिका आणि ग्रामपंचायत हद्दीतील कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे.

 रस्त्यांवर, गटारांमध्ये आणि मोकळ्या जागांवर कचऱ्याचे ढीग साचले असून, दुर्गंधी आणि रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. नागरिकांच्या तक्रारींनंतरही कचरा उचलण्याची व्यवस्था अपुरीच आहे.

 नगरपालिकेकडून नियमित स्वच्छता मोहीम राबवली जात नसून, ग्रामपंचायतीचेही याकडे लक्ष नाही. कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाटीची प्रक्रिया प्रभावीपणे होत नसल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. 

नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे. 

Post a Comment

0 Comments