पुणे २७ जानेवारी,२०२५ : नयनता विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्य खाजगी विद्यापीठ अधिनियमांतर्गत स्थापन करण्यात आले असून, या वर्ग ऑगस्ट 2025 पासून सुरू होतील. जागतिक दर्जाची संस्था म्हणून नावारुपाला येण्याची या विद्यपीठाची महत्त्वाकांक्षा आहे. या विद्यापीठाला कृष्ण गोपालकृष्णन, नादिर गोदरेज, नौशाद फोर्ब्स, मेहर पुदुमजी आणि सतीश रेड्डी यांसारख्या नामवंत उद्योगपतींचे पाठबळ लाभले आहे.
पुण्यातील बावधन येथे नयनरम्य 6 एकर परिसरात वसलेले नयनता विद्यापीठ पूर्णतः निवासी स्वरूपाचा पदवी अभ्यासक्रम प्रदान करणार आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना बदल घडवणारा शैक्षणिक अनुभव देईल, असा विश्वास आहे. उद्घाटन सोहळ्यात कृष्ण गोपालकृष्णन यांनी मूल्याधारित संस्थांचे महत्त्व आणि संस्थात्मक संस्कृती मजबूत करण्यामध्ये संस्थापकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.
भारतात उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची गरज तातडीची असल्याचे नौशाद फोर्ब्स म्हणाले. नयनता विद्यापीठाच्या भेदभाव न करता, गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रियेतील कटिबद्धतेबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला. तसेच, देशाच्या आर्थिक आणि भौगोलिक विविधतेचे प्रतिबिंब विद्यापीठात दिसेल, असेही त्यांनी अधोरेखित केले.
नयनता विद्यापीठाने भारतीय उद्योग महासंघाशी भागीदारी केली आहे. यामुळे सैद्धांतिक शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान, तांत्रिक कौशल्ये आणि सांस्कृतिक साक्षरतेचा समतोल साधणारे वेगळेपण असलेले शिक्षण संरचना तयार करण्यात आली आहे.
डॉ. रंजन बॅनर्जी यांनी नयनता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवासाठी ठरवलेल्या मूलभूत तत्त्वांची रूपरेषा मांडली. त्यांनी व्यक्तिगत काळजी आणि करिअर विकास या दोन मुख्य गोष्टींवर भर दिला. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आत्म-जागरूकता वाढवण्यासाठी वैयक्तिक विकास कार्यक्रम राबवला जाणार आहे. याशिवाय, विद्यापीठात अशा प्रकारची संस्कृती विकसित केली जाईल. या ठिकाणी प्राध्यापक आणि संस्थेचे प्रमुख विद्यार्थ्यांच्या लहान गटांशी, तसेच वैयक्तिक पातळीवर संवाद साधतील. तसेच, प्रत्येक शाखेतील प्रत्येक विद्यार्थ्याला इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये पाच महिन्यांची आणि एका सत्र कालावधीची इंटर्नशिप समाविष्ट असेल. याशिवाय, तीन एक महिन्यांच्या इंटर्नशिपद्वारे विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट, सामाजिक आणि सरकारी क्षेत्रांचा अनुभव घेता येईल. त्यानंतर, आपल्या आवडीच्या क्षेत्रात पाच महिन्यांची इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल.
विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडींना प्राधान्य देण्यासाठी नयनता विद्यापीठ विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहे. विद्यार्थी 18 महिन्यांच्या बहुविषयक आधारभूत कार्यक्रमानंतर आपल्या आवडीचे विषय निवडू शकतील. पहिल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू होईल, आणि पहिल्या बॅचचे वर्ग ऑगस्ट 2025 पासून सुरू होतील.
या उद्घाटन सोहळ्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती, नागरी समाज संघटना, आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नयनता विद्यापीठाच्या उद्दिष्टे आणि दृष्टीकोनाबद्दल सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
Post a Comment
0 Comments