दारु पिताना तीन मित्रांमध्ये झाला वाद एकाचा खून...
लोणी : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरी फार्म तालुका हवेली येथे एकाचा खून झाला आहे. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली
संतोष बापूसाहेब अडसूळ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लगत मांजरी फार्म येथे जगताप नामक व्यक्तीच्या खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये संतोष अडसूळ व दोन अनोळखी व्यक्तींचा दारु पिण्यातून झालेल्या वादातून खून झालेला असावा, अशी माहिती समोर येत आहे. तिघेजण जगताप यांच्या उघड्या खोल्यांमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते त्याच्यातूनच यांच्यात वाद झाला आणि दोघांनी मिळून संतोष अडसुळ यांचा खून केला असावा असा संशय पोलिसांना येत आहे
या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संतोष अडसूळ याचा खून झाला असावा असा संशय वर्तविला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहे.
Post a Comment
0 Comments